दबाव वाढताच मंत्री माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी
As the pressure mounted, Minister Manikrao Kokate resigned. मुंबई (17 डिसेंबर 2025) : सदनिका घोटाळाप्रकरणी जिल्हा न्यायालयाने शिक्षा कायम ठेवल्यानंतर अटकेची तलवार डोक्यावर असल्याने क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती दिली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्राचा संदर्भ देत खातेबदल पत्रावर मंजुरी दिली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच माणिकराव कोकाटे यांच्याकडील सर्व खात्यांची जबाबदारी असणार आहे.
कोकाटे उपचारार्थ दाखल
बुधवारी सकाळीच मुंबईतील लिलावती रुग्णालयात कोकाटे दाखल असल्याची माहिती असून त्यांच्यावर तिथे उपचार सुरू असल्याची माहिती आहे. अजित पवारांकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर माणिकराव कोकाटे यांची खाती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.

मंत्री पदाचा अखेर राजीनामा
नाशिक सत्र न्यायालयाने मंगळवारी सदनिका घोटाळाप्रकरणात माणिकराव कोकाटे यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली दोन वर्षांची शिक्षा कायम ठेवल्याने कोकाटे यांच्या अडचणीत वाढ झाली होती. विरोधी पक्ष माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक झाले होते. कोकाटे यांनी सत्र न्यायालयाच्या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिले मात्र त्याची सुनावणी शुक्रवारी होणार आहे, त्यापूर्वीच माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केल्याने हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कोकाटेंचे खाते आता कुणाला मिळणार? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.







