यावल तहसील कार्यालयात मतमोजणी प्रतिनिधी नियुक्तीसाठी गर्दी


यावल (18 डिसेंबर 2025) : यावल नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल रविवार, 21 डिसेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. तत्पूर्वी 20 डिसेंबर रोजी वॉर्ड क्रमांक आठच्या एका जागेवर मतदान होणार आहे. आता मतमोजणी प्रतिनिधी नियुक्त करण्यासाठीची कार्यवाही तहसील कार्यालयात सुरू करण्यात आली आहे व याकरिता उमेदवारांकडून मतमोजणी प्रतिनिधींची कागदपत्र फोटो ओळखपत्र जमा करण्यास सुरूवात झाली आहे. त्याकरीता बुधवारी तहसील कार्यालयात गर्दी झाली होती.

11 वॉर्डातून 23 नगरसेवक येणार निवडून
यावल नगर परिषद च्या सार्वत्रिक निवडणुकीत लोकनियुक्त नगराध्यक्ष पद आणि 11 वॉर्डातून 23 नगरसेवक निवडीसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यात वार्ड क्रमांक आठच्या एक जागेला वगळता उर्वरित 22 जागेसाठी व लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी मतदान 2 डिसेंबर रोजी झाले आहे. आता एका जागेसाठी येत्या शनिवार, 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया राबवली जाणार आहे.





21 डिसेंबर रोजी यावल तहसील कार्यालयांमध्ये मतमोजणी केली जाणार आहे. या मतमोजणीसाठी प्रत्येक वॉर्डातील उमेदवारांचे प्रतिनिधी नेमण्याची प्रक्रिया देखील तहसील कार्यालयात सुरू झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, नायब तहसीलदार अतुल गांगुर्डे यांच्या वतीने मतदान मतमोजणी प्रतिनिधी नियुक्तीचे काम सुरू झाले आहे. तहसील कार्यालयात शहरातील विविध वॉर्डातील उमेदवारांनी आपापल्या प्रतिनिधी नियुक्तीसाठी या ठिकाणी गर्दी केली होती. प्रतिनिधींचे फोटो, आधारकार्ड सह ओळखपत्र घेऊन या ठिकाणी प्रतिनिधी नेमून त्यांचे ओळखपत्र घेण्याचे काम बुधवारपासून सुरू झाले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !