भुसावळ बाजार समितीत स्थापनेपासून प्रथमच सोयाबीन खरेदीसाठी केंद्र

प्रति क्विंटल 5328 रुपये दर मिळणार


For the first time since its establishment, the Bhusawal market committee has set up a center for soybean procurement भुसावळ (18 डिसेंबर 2025) : राज्य शासनाच्या सहकार व पणन विभागाने किमान आधारभूत योजनेतंर्गत हमी भावाने धान्य खरेदीसाठी नोडल एजन्सी म्हणून बाजार समितींची निवड करण्याचा निर्णय घेतला. यामुळे यंदा तब्बल 1956 नंतर प्रथमतःच अशा प्रकारचे खरेदी केंद्र कृषी उत्पन्न बाजार समितीने कार्यान्वित झाले. खरेदी केंद्रावर एफएक्यू दर्जाच्या सोयाबीन शेतमालास पाच हजार 328 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

यंदा प्रथमच सुरू झाले केंद्र
भुसावळ तालुक्यात यापूर्वी सोयाबीन खरेदी केंद्र नव्हते. यंदा प्रथमच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हे केंद्र सुरू झाले. राज्य शासनाने यंदा बाजार समितींना नोडल एजन्सी म्हणून काम दिल्याचा निर्णय घेतला. यामुळे मोठ्या कालखंडानंतर खरेदी केंद्र सुरू झाले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोमवार, 15 रोजी एनसीसीएफ व नाफेड अंतर्गत सोयाबीन खरेदी केंद्राचा शुभारंभ सभापती अनिल वारके यांच्याहस्ते करण्यात आला.





याप्रसंगी समितीचे सर्व संचालक मंडळ तसेच शेतकर्‍यांची उपस्थिती होती. समिती स्थापनेपासून म्हणजे सन 1956 नंतर प्रथमतःच अशा प्रकारचे खरेदी केंद्र कृषी उत्पन्न बाजार समितीने कार्यान्वित केलेले आहे. एकाच ठिकाणी नोंदणी व खरेदीही होणार असल्याने तालुक्यातील शेतकर्‍यांना दिलासा मिळणार आहे. शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन सभापती अनिल वारके, सचिव नितीन पाटील यांनी केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !