भुसावळावतील डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी उधळले कलागुणांचे रंग
भुसावळ (18 डिसेंबर 2025) : शहरातील गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलचे दोन दिवशीय स्नेहसंमेलन 16 रोजी उत्साहात झाले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भुसावळ विभागाचे डीवायएसपी संदीप गावीत होते. विशेष उपस्थिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे यांची होती.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सेक्रेटरी डॉ.वर्षा पाटील, स्कूलच्या प्रिन्सिपल अनघा पाटील व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात प्रमुख पाहुणे संदीप गावीत यांच्याहस्ते द्वीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करून झाले. प्रसंगी संदीप गावीत यांनी विद्यार्थ्यांना व पालकांना सायबर क्राईम तसेच इतर फसवेगिरी होणार्या बाबत सावध राहण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष देण्याचे सांगितले.




वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.त्यानंतर डॉ उल्हास पाटील यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.स्नेह संमेलनाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी विविध कलागुण व नृत्य सादर करून उपस्थितांचे मन जिंकले. यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन पुनम कुंदू तर आभार कॅलेब खंडागरे यांनी मानले.