भारताच्या विकासाच्या पायाभरणीत अल्पसंख्यांक समुदायाचे मोठे योगदान : प्रा.जोगेश्वरी पाटील


भुसावळ (18 डिसेंबर 2025)  लोकशाहीचे यश हे बहुसंख्य लोक अल्पसंख्याकांना किती सुरक्षित ठेवतात यावर अवलंबून असते. या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधानाचा दाखला देत संविधानाने सर्वांना सर्वप्रथम ते भारतीय असल्याचे बिंबवले आहे, असे अधोरेखित केले. अल्पसंख्यांक समुदायातील लोकांसाठी सरकारने अनेक प्रकारच्या शैक्षणिक व कौशल्य विकास योजना आणून त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण केली आहे. अल्पसंख्यांक समुदायाने खर्‍या अर्थाने राष्ट्रनिर्मितीत अनमोल योगदान दिले असल्याचे विचार प्रा.जोगेश्वरी पाटील यांनी व्यक्त केले.

अल्पसंख्यांक हक्क दिन
कला, विज्ञान आणि पु.ओं.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभागांतर्गत अल्पसंख्यांक हक्क दिन साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे होते. प्रमुख उपस्थिती अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ.एस.टी.धूम, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.विलास सोळुंके, प्रा.संगीता भिरुड, डॉ.साहेबराव राठोड यांची होती.





प्राचार्य डॉ.बी.एच.बर्‍हाटे यांनी भारत हा सर्व समुदाय, जाती, धर्म, पंथ यांच्या एकत्रीत प्रयत्नातून उभा राहिला आहे आणि जगभरात तो त्याच्या सहिष्णुतेसाठी ओळखला जातो, असे मत नमूद केले.

प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.विलास सोळुंके यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.प्रिया लोहार तर आभार प्रा.सुनील अडकमोल यांनी मानले. यशस्वीतेसाठी विद्यार्थी विकास विभागाच्या विद्यार्थिनी ऋचा मिटकरे, नयना पाटील, फाल्गुनी चौधरी, आश्विनी गुरव, तेजस्विनी पाटील, राशि मेने, अमोल गुजर यांनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !