औट्रम (कन्नड) घाटाची जळगाव जिल्हाधिकार्यांकडून पाहणी
Outram (Kannada) Ghat inspected by the Jalgaon District Collector जळगाव (18 डिसेंबर 2025) : जळगाव व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांना जोडणार्या औट्रम (कन्नड) घाट मार्गावरील वाहतुकीच्या सद्यस्थितीची पाहणी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केली. या पाहणीदरम्यान घाटातील रस्त्यांची स्थिती, वाहतुकीतील अडथळे, वाहतूक नियंत्रण व सुरक्षितता उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
वाहतूक कोंडी टाळण्याचे निर्देश
घाट मार्गावरील वाहतूक सुरळीत व वेळेत सुरू राहील याची दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकार्यांनी संबंधितांना दिले तसेच वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आवश्यक त्या तातडीच्या उपाययोजना राबविणे, अपघातप्रवण ठिकाणी विशेष खबरदारी घेणे व प्रतिबंधात्मक उपाय लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या. यासोबतच वाहतूक पोलीस, नगरपरिषद व महसूल प्रशासन यांच्यात प्रभावी समन्वय ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिल्या.









