जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणुकांमुळे 19 ते 21 डिसेंबरदरम्यान मद्यविक्री राहणार बंद


Due to the municipal council elections in Jalgaon district, the sale of liquor will remain closed between December 19 and 21 जळगाव (18 डिसेंबर 2025) : राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील नगर परिषद नगर पंचायत सुधारीत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार जळगाव जिल्ह्यातील भुसावळ, अमळनेर, सावदा, यावल, वरणगाव, पाचोरा या 6 नगर परिषद मधील 09 प्रभागांमध्ये 20 डिसेंबर रोजी मतदान तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

सहा पालिकेत निवडणूक
जळगाव जिल्हयातील भुसावळ, अमळनेर, सावदा, यावल, वरणगाव, पाचोरा या सहा नगरपरिषदेमधील काही जागांवर सुधारीत निवडणुक कार्यक्रमानुसार मतदान पार पडणार आहे. या नगरपरिषद / नगरपंचायत हद्दीतील ठोक व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती 19 डिसेंबर मतदानाचा अगोदरचा दिवस, 20 डिसेंबर मतदानाच्या दिवसापर्यंत संपुर्ण दिवस तसेच 21 डिसेंबर मतमोजणीचा दिवस मतमोजणी प्रक्रिया संपेप्रर्यंत जामनेर, अमळनेर, भडगाव, भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, मुक्ताईनगर, नशिराबाद, पाचोरा, पारोळा, रावेर, सावदा, शेंदुर्णी, वरणगाव आणि यावल या नगरपरिषद आणि नगरपंचायत हद्दीतील ठोक व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले आहेत.

या आदेशाचे जळगाव जिल्हयातील संबधीत सर्व ठोक व किरकोळ मद्यविक्री अनुज्ञप्तीधारकांनी काटेकोर पालन करावे. जे अनुज्ञप्तीधारक या आदेशाचे उल्लघंन करतील, त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अन्वये कठोर कारवाई करण्यात येईल. याची नोंद घ्यावी, असे प्रशासनातर्फे प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !