जळगाव जिल्ह्यात 19 व 20 डिसेंबरला मतदान केंद्र म्हणून वापरल्या जाणार्या शाळांना सुटी जाहीर
In Jalgaon district, a holiday has been declared for schools that will be used as polling stations on December 19th and 20th जळगाव (18 डिसेंबर 2025) : राज्य निवडणूक आयोगाकडून नगर परिषद व नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025 चा कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार जळगाव जिल्ह्यातील नगर परिषद नगर पंचायत सुधारीत सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या निवडणूक कार्यक्रमानुसार जळगाव जिल्हयातील भुसावळ, अमळनेर, सावदा, यावल, वरणगाव, पाचोरा या सहा नगर परिषदेमधील नऊ प्रभागांमध्ये शनिवार, 20 डिसेंबर रोजी मतदान तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हयातील भुसावळ, अमळनेर, सावदा, यावल, वरणगाव, पाचोरा या नगर परिषदा/ नगर पंचायतीच्या हद्यीतील ज्या प्रभागांमध्ये मतदान आहे त्या प्रभागातील मतदान केंद्र असणार्या शाळांना 19 आणि 20 डिसेंबर 2025 रोजी सुटी जाहीर करण्यात आली आहे.

मतदानाच्या एक दिवस आधी म्हणजेच शुक्रवार, 19 डिसेंबर 2025 रोजी संबंधित मतदान अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहचणार आहेत त्यामुळे ही सुटी देण्यात आल्याचे प्रशासनाने सांगितले.
ही सुटी राज्य निवडणूक आयोगाच्या उपसचिव यांच्या आदेश क्रमांक-रानिआ/मनपा- 2008/प्र.क्र.9/का-5 दिनांक 11 नोव्हेबर 2008 च्या आदेशान्वये देण्यात आली आहे. जिल्ह्यातील संबंधित शाळांच्या सुट्यांची नोंद पालक व विद्यार्थी यांनी घ्यावी, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

