अमळनेरात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्री आठ दुकाने फोडली


Thieves wreak havoc in Amalner: Eight shops broken into in a single night अमळनेर (19 डिसेंबर 2025) : शहरात मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्री सात ते आठ दुकाने फोडल्याची खळबळजनक घटना सकाळी सात वाजता समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाले आहेत.

मध्यरात्री चोरट्यांचा धुमाकूळ
अमळनेर शहराच्या मुख्य भागातील बाजारपेठेत चोरट्यांनी मध्यरात्री दुकानांच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. सकाळी सात वाजता जेव्हा दुकानदार नेहमीप्रमाणे आपली दुकाने उघडण्यासाठी आल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. दुकानांमधील सामानाची मोठ्या प्रमाणावर नासधूस करण्यात आली असून रोख रक्कमेसह मौल्यवान साहित्य लंपास करण्यात आले

चोरट्यांनी अत्यंत नियोजित पद्धतीने एकापाठोपाठ एक दुकाने साफ केली. यात मयूर मोबाईल, सना इलेक्ट्रॉनिक, गुरुकृपा इलेक्ट्रॉनिक, पी. जी. टेलर्स, दुर्गा टी डेपो, सुविधा मोटर वायडिंग या नामांकित दुकानांसह अन्य काही छोट्या व्यवसायांचा समावेश आहे. प्राथमिक अंदाजानुसार, या चोरीत व्यापार्‍यांचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. शहरातील वाढत्या चोर्‍यांमुळे व्यापारी धास्तावले असून पोलिस प्रशासनावरही नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे. चोरट्यांना अटकेचे आव्हान पोलिसांपुढे आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !