भुसावळातील भोळे महाविद्यालयात मानव श्वान संघर्ष व रेबीज प्रतिबंधात्मक उपाययोजनेवर व्याख्यान
भुसावळ (19 डिसेंबर 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात विद्यार्थी विकास समिती व नगरपालिका रुग्णालयामार्फत बुधवार, 17 रोजी यांनी मानव श्वान संघर्ष व रेबीज प्रतिबंधात्मक उपाययोजना यावर डॉ.अथर्व राणे यांचे मार्गदर्शपर व्याख्यान झाले. ते म्हणाले की, रेबीज प्रतिबंधासाठी लसीकरण व त्वरित उपचार अत्यावश्यक आहे. श्वान संघर्ष टाळण्यासाठी व्यवस्थापन, जनजागृती आणि सहअस्तित्व गरजेचे आहे. प्रशासन + नागरिक + पशुसंवर्धन विभाग यांचा समन्वय हिंसा न करता मानवी आणि शास्त्रीय पद्धतीने समस्या सोडवणे गरजेचे आहे. शहरांमध्ये व गावांमध्ये वाढती कुत्र्यांची संख्या यामुळे संघर्ष वाढत आहे. नसबंदी व लसीकरण स्थानिक स्वराज्य संस्थांनी कार्यक्रम प्रभावी राबवणे आवश्यक आहे.
यांची होती उपस्थिती
जळगाव विभाग प्राचार्य महासंघाचे उपाध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजू फालक, नगरपालिका रुग्णालयाच्या आशा वर्कर लक्ष्मी तायडे, सोनी अहिरे, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.एस.डी.चौधरी, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.डॉ.माधुरी पाटील, प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.दीपक जैस्वाल, प्रा.खिलचंद धांडे, प्रा.अश्विनी भाग्यवंत, प्रा.सुशीला भाटे, प्रा.गायत्री नेमाडे, युवराज चौधरी, सुनील ठोसर, प्रकाश सावळे उपस्थित होते.



