टेस्टींगदरम्यान जलकुंभ कोसळून सात कामगार ठार : तिघे अत्यवस्थ


During testing, a water tank collapsed, killing seven workers; three are in critical condition बुटीबोरी, नागपूर (20 डिसेंबर 2025) : बुटीबोरी एमआयडीसी परिसरातील ‘अवाडा’ कंपनीच्या आवारात 15 लाख लिटर पाणी साठवणूक असलेल्या टाकीतील पाण्याचे टेस्टिंग सुरू असताना टाकी फुटल्याने तीन कामगारांचा जागीच तर चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर तिघे अत्यवस्थ आहेत. ही धक्कादायक घटना शुक्रवार, 19 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली.

यांचा ओढवला मृत्यू
मृतांमध्ये सुधांशू नागेश्वर साहनी (30, रा.मुजफ्फरपूर, बिहार), बुलेटकुमार इंद्रजीत सहा (30, रा.मिश्रोली, सुहानी, प.चंपारण, बिहार), शमीम हसमत अन्सारी (28, रा.भागवत पारसा, गोपालगंज, बिहार), अरविंदकुमार ठाकूर (28, रा.चंपारण, बिहार), अशोक कंचन पटेल (42, रा.पहाडपूर, बिहार) व अजय राजेश्वर पासवान (26, रा. मुजफ्फरपूर, बिहार) अशी मृतांची नावे असून एकाचे नाव कळू शकलेले नाही.


पाण्याचे टेस्टिंग सुरू असतानाच फुटली टाकी
‘अवाडा’ कंपनीत’ सोलार सेल’ तयार केले जातात. त्यासाठी शुद्ध पाणी वापरले जाते. त्यासाठी पाण्याच्च्या तीन वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात. यापैकी कुठलीतरी टेस्ट करताना टाकी फुटली आणि कामगारांचा जीव गेला.

 










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !