उत्कंठा शिगेला : भुसावळात दुपारी तीन वाजेपर्यंत हाती येणार निकाल
मतमोजणी मार्गावर एकेरी वाहतूक : नगराध्यक्ष पदासह 46 जागांवरील निकालाकडे शहरवासीयांचे लक्ष : नगसेवकांसोबत नगराध्यक्ष पदाचीही मतमोजणी मात्र अखेरीस जाहीर होणार निकाल
Excitement reaches its peak: The results in Bhusawal will be available by 3 PMभुरावळ (20 डिसेंबर 2025) नाशिक विभागातील एकमेव ‘अ’ वर्ग नगरपालिकेसाठी 2 डिसेंबरला मतदान झाल्यानंतर आता रविवार, 21 डिसेंबर रोजी रोजी जाहीर होणार्या निकालाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत नगराध्यक्ष पदासह 46 जागांचे निकाल हाती येतील, असे सूत्रांनी सांगितले. रविवारी होणार्या मतमोजणीमुळे जळगाव रोडवरील गांधी पुतळा ते टेक्निकल हायस्कूलपर्यंतच्या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू राहणार असून मार्ग बॅरीकेटींग लावून बंद करण्यात आला आहे.
रविवारी सकाळी 10 वाजेपासून मतमोजणी
जळगाव रोडवरील तहसील कार्यालयाच्या आवारातील गोदामात रविवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरूवात होईल. सुरूवातीला पोस्टल बॅलेटची मतमोजणी झाल्यानंतर 10.15 वाजता ईव्हीएममधील मतांची मोजणी होईल. मतमोजणीसाठी साधारण 15 टेबल लावण्यात आले असून 45 अधिकारी, कर्मचारी नियुक्त असतील. पालिकेत नगरसेवकपदाच्या 50 जागा असल्यातरी चार जागा यापूर्वीच बिनविरोध निवडून आल्यानंतर रविवारी 46 जागांचा निकाल दुपारी तीन वाजेपर्यंत लागेल तर नगराध्यक्षपदासाठीदेखील मतमोजणी याचवेळी होईल मात्र निकाल अखेरच्या सुमारास जाहीर करण्यात येणार आहे.

वाहतूक वळवली
रविवारी फैजपूर व यावलकडून येणारी सर्व वाहने महात्मा गांधी पुतळा जळगाव रोडने नेहमीप्रमाणे जातील मात्र जळगावकडून यावल व फैजपूरकडे जाणारी वाहने टेक्निकल हायस्कूल, एन.के.नारखेडे विद्यालय, शांतीनगर मार्गे यावल रोडवरील साई जीवन सुपरशॉपपर्यंत कळवली जातील तसेच रविवारचा आठवडे बाजारही बंद असेल. मतमोजणीमुळे महात्मा गांधी पुतळा ते टेक्निकल हायस्कूलपर्यंतच्या रस्त्यावर गर्दी राहणार असल्याने या रस्त्यावर बॅरीकेटींग करण्यात आले आहे.
दोन प्रभागासाठी अखेरच्या क्षणी मतमोजणी
शहरातील प्रभाग क्रमांक 11 ब व 4 ब साठी शनिवार, 20 रोजी निवडणूक झाली. अतिशय संथ गतीने झालेल्या मतदान प्रक्रियेत दुपारी साडेतीन वाजेपर्यंत दोन हजार 752 मतदारांनी (32.84) टक्के मतदान केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या दोन्ही प्रभागातील मतदानाची मोजणी अखेरच्या क्षणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
