जेजुरीत विजयी जल्लोषादरम्यान भंडारी उधळताच आग : दोघे नगरसेवक भाजले
Fire breaks out in Jejuri as turmeric powder is thrown during victory celebrations : Two corporators suffer burns पुणे (21 डिसेंबर 2025) : पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे विजयी जल्लोषाच्या मिरवणुकीदरम्यान आगीची घटना घडली. जेजुरी गडाच्या कमानीजवळ सुरू असलेल्या भंडार्याच्या उधळणीदरम्यान अचानक मोठा भडका उडाल्याने एकच खळबळ उडाली.
प्राथमिक माहितीनुसार, कापूर पेटवलेला असतानाच त्यावर भंडारा पडल्याने आगीचा भडका उडाला. या घटनेत विजयी उमेदवार स्वरूपा खोमणे आणि घाडगे हे दोघे गंभीररित्या भाजले असल्याची प्राथमिक माहिती आहे. या दोघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

शिवाय आगीत 18 जण भाजले असल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींमध्ये कार्यकर्ते व नागरिकांचा समावेश आहे. घटनेनंतर काही काळ परिसरात पळापळ झाली. स्थानिक नागरिक, पोलीस व अग्निशमन दलाने तात्काळ मदतकार्य सुरू करून आग आटोक्यात आणली.
