सातव्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्राथमिक शिक्षिका ज्योती वानखेडेंना सुवर्णपदक
भुसावळ (22 डिसेंबर 2025) : सिख गेम्स फेडरेशन ऑफ इंडियातर्फे अमृतसर (पंजाब) येथे सिख गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया सातवी नॅशनल योग स्पर्धा झाली. या स्पर्धेत वांजोळा, ता.भुसावळ प्राथमिक शाळेच्या शिक्षिका ज्योती मुरलीधर वानखेडे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत गोल्ड मेडल (सुवर्ण पदक) पटकावले. योगासन क्षेत्रातील ही स्पर्धा राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठेची मानली जाते.
ज्योती वानखेडे यांनी आपल्या मेहनत, आत्मविश्वास व सातत्यपूर्ण सरावाच्या जोरावर हे यश मिळवले. आता ज्योती वानखेडे यांची निवड आंतरराष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी झाली असून ही स्पर्धा येत्या जानेवारी 2026 दरम्यान थायलंड येथे होणार आहे.

