भुसावळातील के.नारखेडे विद्यालयातील चिराग नरवाडे बॉक्सींग स्पर्धेत तृतीय


भुसावळ (22 डिसेंबर 2025) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, अकोला व जिल्हा क्रीडा अधिकारी, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 40 ते 42 किलो वजनी गटात के.नारखेडे विद्यालयातील इयत्ता आठवीचा विद्यार्थी चिराग युवराज नरवाडे या विद्यार्थ्याने अकोला येथील वसंत देसाई स्टेडियममध्ये 18 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या 14 वर्षीय गटासाठी आयोजित राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत विशेष प्राविण्य प्रमाणपत्र प्राप्त करून तिसरा क्रमांक प्राप्त केला.

विद्यार्थ्यावर अभिनंदनाचा वर्षाव
या यशाबद्दल संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे, शालेय समिती चेअरमन श्रीनिवास नारखेडे, संस्था सदस्य भाग्येश नारखेडे, संस्था सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, संस्थेचे ऑनररी जॉईंट सेक्रेटरी प्रमोद नेमाडे, संस्था सदस्य विकास पाचपांडे, मुख्याध्यापिका संगीता अडकमोल, संगणक विभागप्रमुख बी.ए.पाटील, पर्यवेक्षक सुनील राणे, सुनील पाठक, क्रीडा शिक्षक निलेश नेहेते, प्रदीप सपकाळे व नवीन नेमाडे तसेच विद्यालयातील व संगणक विभागातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !