बालचित्रकला स्पर्धेत के.नारखेडेचा विद्यार्थी सम्यक इखारे जिल्ह्यात प्रथम
भुसावळ (22 डिसेंबर 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालयाचा विद्यार्थी सम्यक गणेश इखारे याने महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई तर्फे आयोजित राज्यस्तरीय बाल चित्रकला स्पर्धा 2025 मध्ये सहभाग नोंदवत राज्यस्तरीय गुणवत्ता प्रमाणपत्र निवड यादीत सहावा क्रमांक व जिल्हास्तरीय यादीत प्रथम क्रमांकाने यश मिळवले.
ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात 14 नोव्हेंबर 2025 रोजी बाल दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य कला संचालनालय मुंबई वमहाराष्ट्र राज्य कलाशिक्षण मंडळ मुंबई यांच्या माध्यमातून झाली.

या यशाबद्दल विद्यार्थ्याचे संस्थाध्यक्ष डॉ.मकरंद नारखेडे, चेअरमन श्रीनिवास नारखेडे, संस्था सेक्रेटरी पी.व्ही.पाटील, संस्था सदस्य भाग्येश नारखेडे, संस्था सदस्य प्रमोद नेमाडे, विकास पाचपांडे, शाळेच्या मुख्याध्यापिका संगीता अडकमोल, पर्यवेक्षक एस.एल.राणे, एस.पी.पाठक, संगणक विभाग प्रमुख बी.ए.पाटील, माधव गरुडे तसेच सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी अभिनंदन केले.
