भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये नाताळ सण उत्साहात


भुसावळ (22 डिसेंबर 2025) : शहरातील कोलते फाउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित द वर्ल्ड स्कूलमध्ये नाताळ हा सण उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेमध्ये क्रिफ्ट डेकोरेशन व कॅरल सिंगिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध गाण्यांवर आपले नृत्य सादर केले.

यांची होती उपस्थिती
शाळेच्या मुख्याध्यापिका पेट्रीश्या ह्यॅसेट यांचे स्वागत जेनिफर ऍंथोनी आणि भारती पेट्रिक यांनी केले. शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. सांताक्लॉजनी येऊन मुलांचे मनोरंजन केले व मुलांना चॉकलेट वाटप केले. शाळेतील पर्यवेक्षिका शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !