भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव
भुसावळ (22 डिसेंबर 2025) : शहरातील कोलते फाउंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित ‘द वर्ल्ड स्कूल’ मध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात पार पडला. प्रमुख अतिथी शाळेचे अध्यक्ष निशिकांत कोलते, सचिव राजश्री निशिकांत कोलते यांचे स्वागत मुख्याध्यापिका पेट्रिश्या ह्यसेट यांनी केले.
पाचवी-दहावीच्या विद्यार्थ्यांनी मास परेड करून मान्यवरांना सलामी दिली. त्यानंतर हाऊसनुसार आकर्षक मास ड्रिल सादर झाली. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. सूत्रसंचालन जेनिफर ऍंथोनी व लक्ष्मी तायडे यांनी केले तर क्रीडा आयोजन सुमित दासगुप्ता व अश्विनी पाल यांनी पाहिले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे उत्तम सहकार्य लाभले.

