जळगावात ओपन 2025 राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन
The Open 2025 State Level Badminton Tournament will be organized in Jalgaon जळगाव (22 डिसेंबर 2025) : रायसोनी फाउंडेशन स्पोर्ट्स अॅण्ड कल्चर आणि रायसोनी इंजिनियरिंग कॉलेज, जळगाव प्रायोजित व जैन इरिगेश सिस्टीम्स लि.सहप्रायोजीत तसेच जळगाव जिल्हा बॅडमिंटन व जैन स्पोर्टस अकॅडमी आयोजीत ‘योनेक्स सनराइज जी.एच.रायसोनी जळगाव ओपन 2025 बॅडमिंटन टूर्नामेंट’ जळगावात होणार आहे. ही स्पर्धा महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेकडून मान्यता प्राप्त आहे. 24 ते 28 डिसेंबर दरम्यान जळगाव जिल्हा क्रीडा संघातील बॅडमिंटन हॉल, व.वा. वाचनालय जवळ जळगाव येथे होईल.
योनेक्स सनराइज जी.एच.रायसोनी जळगाव ओपन 2025
बॅडमिंटन टूर्नामेंटमध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, अकोला, बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील खेळाडू सहभागी होतील. ही स्पर्धा 9, 11, 13, 15, 17, 19 वर्षा आतील मुले व मुली एकेरी तसेच 19 वर्षावरील खुलागट आणि 35 वर्षावरील वरिष्ठ गट मधील पुरुष व महिला एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी गटात खेळविण्यात येणार आहे. या स्पर्धेत नोंदणी साठी 21 डिसेंबर अंतिम तारीख होती. या स्पर्धेमध्ये नऊ जिल्ह्यांमधून एकूण 250 खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे तसेच या स्पर्धेत विजयी व उपविजयी होणार्या खेळाडूंना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे, असे जैन स्पोर्टस अकॅडमीचे प्रशिक्षक किशोर सिंह यांनी सांगितले आहे. सर्व सहभागी खेळाडूंना स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, सचिव विनित जोशी यांच्यासह पदाधिकार्यांनी हार्दिक शुभेच्छा दिले आहे.

