चंद्रपूरचा पराभव जिव्हारी लागताच मुनगंटीवारांचा फडणवीसांसह बावनकुळेंवर निशाणा : म्हणाले ; मुख्यमंत्रीपद असो वा मंत्रिपद काहीच शाश्वत नाही


Deeply hurt by the defeat in Chandrapur, Mungantiwar targeted Fadnavis and Bawankule, saying; neither the Chief Minister’s post nor a ministerial position is permanent. चंद्रपूर (22 डिसेंबर 2025)  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी ‘मुख्यमंत्रीपद असो वा मंत्रिपद काहीही शाश्वत नसते’ असे तिखट मत व्यक्त करीत खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेसने चंद्रपूर जिल्ह्यात प्रचंड मुसंडी मारल्यामुळे मुनगंटीवार संतप्त झाल्याचे पहायला मिळत आहे. यावेळी बावनकुळेंना त्यांच्या पडत्या काळाचीही आठवण त्यांनी करून दिली आहे.

चंद्रपूरात भाजपाचा पराभव
नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपला दैदिप्यमान यश मिळाले पण चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाचा दारुण पराभव झाला. येथे काँग्रेसचे 11 पैकी आठ जागांवर नगराध्यक्ष निवडून आल्याने माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी भाजपच्या राज्यातील नेतृत्वावर टीकेची झोड उठवली आहे. त्यानंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण मुनगंटीवार यांनी त्यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले, मी कधीच नाराज असत नाही. माझ्या आयुष्यात महादेवाने मला नाराज न होण्याची शक्ती दिली आहे. पण भाजपचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून योग्य वेळी योग्य सल्ला देण्याची जबाबदारी माझी आहे.

मुख्यमंत्रीही पर्मनंट नाहीच
कार्यकर्ते जे भूमिका माझ्यापर्यंत पोहोचवतात ते सांगण्याची जबाबदारी माझी आहे. ती जबाबदारी व्यवस्थितपणे मी पार पाडतो. मला मंत्रिपद नाकारण्यात आले. त्याची नाराजी माझ्यात नव्हे तर येथील जनतेत आहे. मंत्रिपद येते आणि जाते. मुख्यमंत्रीपदही ज्यांचे आहे त्यांचे येणार आहे जाणारही आहे. पर्मनन्ट कुणीही नाही. शेवटच्या श्वासापर्यंत कुणीही मंत्री, आमदार, खासदार किंवा मुख्यमंत्री नाही.

बावनकुळेंना करून दिली पडत्या काळाची आठवण
सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रिपद नसण्याचा व पराभवाचा थेट संबंध नसतो या विधानाचाही समाचार घेतला. चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना आता असे वाटणे साहजिक आहे. पण मध्यंतरी जेव्हा त्यांची शक्ती करण्यात आली होती, तेव्हा त्यांनाही असेच वाटत होते, असे ते बावनकुळेंना त्यांच्या पडत्या काळाची आठवण करून देताना म्हणाले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !