भुसावळ पोलिस उपअधीक्षकपदी केदार बारबोले


गणेश वाघ
भुसावळ (22 डिसेंबर 2025) : भुसावळचे पोलिस उपअधीक्षकपदी नागपूर शहर सहाय्यक पोलिस आयुक्त केदार प्रकाश बारबोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बारबोले यांनी यापूर्वी 2024 मध्ये जळगावात प्रोबेशनरी अधिकारी म्हणून काम केल्याने त्यांना जिल्ह्याची इत्यंभूत माहिती आहे. राज्य शासनाच्या गृह विभागाचे कार्यासन अधिकारी मृणाल कृष्णा सावंत यांनी बदलीबाबत आदेश जारी केले आहेत.

संदीप गावीत यांची दोन दिवसात पदोन्नतीवर बदली
भुसावळचे संदीप गावीत यांची अपर पोलिस अधीक्षक/सहाय्यक पोलिस अधीक्षकपदी पदोन्नतीवर बदली होणार असून दोन दिवसात त्यांच्या बदलीचे आदेश निघण्याची शक्यता असून या आदेशापूर्वीच भुसावळात केदार बारबोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शांत व शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

पाच महिन्यांपूर्वीच गावीत यांनी स्वीकारला पदभार
भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांची बढतीवर पुणे टास्क फोर्समध्ये बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी जळगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांची 31 जुलै 2025 रोजी नियुक्ती करण्यात आली होती मात्र अवघ्या पाच महिन्यात गावीत यांची बदली होत आहे. अपर पोलिस अधीक्षकपदी त्यांचे प्रमोशन होणार असून त्यांच्या बदलीची दोन दिवसात ऑर्डर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !