तत्काळ तिकिट बुकिंगसाठी शंभर रेल्वे गाड्यांना ओटीपी आधारित व्यवस्था लागू
भुसावळ (24 डिसेंबर 2025) : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि तिकिट बुकिंग प्रक्रियेत पारदर्शकता व सुरक्षितता वाढविण्याच्या उद्देशाने 18 डिसेंबर 2025 पासून पीआरएस आरक्षण तिकीट काउंटरवर तत्काळ तिकिट बुकिंगसाठी ओटीपी आधारित व्यवस्था लागू करण्यात येत आहे.या नव्या प्रणालीअंतर्गत ताप्ती गंगा एक्सप्रेस, आजाद हिंद एक्सप्रेस, गया-हावड़ा एक्सप्रेस यांसह एकूण 100 गाड्यांसाठी तत्काळ तिकिटे ओटीपी द्वारेच बुक करता येणार आहेत.
या व्यवस्थेमुळे दलालांचा हस्तक्षेप रोखण्यास मदत होणार असून, खर्या प्रवाशांना तत्काळ तिकिट मिळणे अधिक सुलभ होणार आहे. पीआरएस काउंटरवर तिकिट काढताना प्रवाशांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी पाठविण्यात येईल. सदर ओटीपी पडताळणीनंतरच तत्काळ तिकिट बुकिंग प्रक्रीया पूर्ण होणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे तिकिट बुकिंग अधिक सुरक्षित होणार असून प्रवाशांना विश्वासार्ह व सुलभ सेवा मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या आणि नेहमीच गर्दी असलेल्या गाड्यांमध्ये प्रवास करणार्या प्रवाशांना या निर्णयाचा मोठा लाभ होणार आहे.

मध्य रेल्वेतून सुटणार्या 100 रेल्वे गाड्यांना ही प्रणाली लागू झाली आहे, ताप्ती गंगा, आजाद हिंद, गया-हावड़ा एक्स्प्रेससह 100 गाड्यांसाठी नवीन प्रणाली लागू केली आहे. यामुळे प्र्वाशांना तिकीट काढतांना दिलासा मिळणार आहे.
