बडनेरा-नाशिक रोड अनारक्षित विशेष गाडीचा कालावधी वाढला
प्रवाशांची वाढलेली गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेचा निर्णय; 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत धावणार
भुसावळ (25 डिसेंबर 2025) : मध्य रेल्वेने प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता बडनेरा-नाशिक रोड दरम्यान धावणार्या अनारक्षित विशेष गाडीचा कालावधी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रवाशांना नववर्षाच्या सुरुवातीस तसेच फेब्रुवारीअखेरपर्यंत दिलासा मिळणार आहे.
गाडी क्रमांक 01211 बडनेरा-नाशिक रोड अनारक्षित दैनिक विशेष ही गाडी पूर्वी 31 डिसेंबर 2025 पर्यंत चालविण्याचे नियोजित होते. आता ही गाडी 1 जानेवारी 2026 ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत वाढविण्यात आली असून एकूण 59 फेर्या होणार आहेत.

त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 01212 नाशिक रोड-बडनेरा अनारक्षित दैनिक विशेष ही गाडीदेखील पूर्वी 31 डिसेंबर 2025 पर्यंत चालणार होती. मात्र, तिचाही कालावधी 1 जानेवारी 2026 ते 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत वाढविण्यात आला असून या गाडीच्याही 59 फेर्या होतील.
या दोन्ही विशेष गाड्यांच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये व संरचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
