यावल नगरपरिषदेच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षा छाया पाटील यांचा केला भुसावळच्या शिवसेनेच्या पदाधिकार्यांनी सन्मान
भुसावळ (30 डिसेंबर 2025) : जळगाव जिल्ह्यातील यावल नगर परिषदेच्या नगराध्यक्षछाया अतुल पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने निवडणूक लढवून विजय मिळवला.
त्यानिमित्ताने भुसावळ तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या वतीने, जिल्हाप्रमुख चंद्रकांत शर्मा, जिल्हा सह समन्वयक प्रा.उत्तम सुरवाडे, रेल्वे कामगार सेनेचे ललित मुथा, शहर प्रमुख मकबूल मेंबर, शहर प्रमुख गणेश सोनवणे, कट्टर शिवसैनिक नमा शर्मा, यांनी नगराध्यक्षांच्या निवासस्थानी भेटवस्तू देऊन सत्कार केला. आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अतुल पाटील यांनी याप्रसंगी शिवसेनेच्या वाढीसाठी भविष्यातील रणनीतीवर चर्चा केली.

