रिपाइंला एकही जागा न दिल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले संतापले
Union Minister Ramdas Athawale was angered by the fact that the RPI was not given a single seat. मुंबई (30 डिसेंबर 2025) : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत रिपाइं (आठवले गट) ला एकही जागा सत्ताधारी भाजप व शिवसेनेने न सोडल्याने केंद्रीय मंत्री रामदास आठवले चांगलेच संतापले आहेत. महायुतीने आमच्यासोबत विश्वासघात केला. आम्ही हा अपमान कदापि सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी या प्रकरणी त्यांनी भाजप व शिवसेनेला दिला आहे.
जागा वाटपाता स्थान नाही
मुंबई महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिलेत. भाजप व शिंदे गटाचे सोमवारी जागा वाटप निश्चित करण्यात आले. त्यानुसार, मुंबईत भाजप सर्वाधिक 137 व शिंदे गट 90 जागांवर लढणार आहे. या जागा वाटपात रिपाइंने महायुतीकडे 16 जागांची मागणी केली होती पण भाजप व शिंदे गटाने त्यांना योग्य तो मान राखण्याचा शब्द देत शेवटपर्यंत झुलवत ठरले. यावर रामदास आठवले यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्यानंतर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी रामदास आठवले यांची त्यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

प्रवीण दरेकरांनीही रामदास आठवलेंना मुंबईत रिपाइंला सन्मानकारक जागा सोडण्याचा शब्द दिला होता. पण आता शिवसेना – भाजपच्या प्रत्यक्ष जागावाटपात रिपाइंला एकही जागा सोडण्यात आली. यामुळे आठवले चांगलेच संतप्त झालेत. त्यांनी आपला संताप एका पोस्टद्वारे व्यक्त केला.
हा निव्वळ विश्वासघात : रामदास आठवले
रामदास आठवले म्हणाले, महायुतीच्या स्थापनेपासून आम्ही अत्यंत प्रामाणिकपणे आणि खंबीरपणे सोबत राहिलो आहोत मात्र आज जागा वाटपाच्या बाबतीत जो प्रकार घडला आहे, तो निव्वळ विश्वासघात आहे. चर्चेसाठी काल दुपारी चार वाजताची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, मित्रपक्षांकडून त्याचेही पालन करण्यात आले नाही. हा प्रकार म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय नसून आमच्या स्वाभिमानावर केलेला आघात आहे.
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तोंडावर असताना कार्यकर्त्यांचा हा अपमान मी कदापि सहन करणार नाही त्यामुळेच आज माझे कार्यकर्ते जो काही निर्णय घेतील, तो मला पूर्णपणे मान्य असेल. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करून, आज दुपारी पक्षाचा अंतिम निर्णय आणि भूमिका अधिकृतपणे जाहीर केला जाईल, असे रामदास आठवले यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
