दीपनगरात मद्यधूंद कॅशिअरची सुरक्षा रक्षकाला मारहाण
In Deepnagar, a drunk cashier assaulted a security guard भुसावळ (30 डिसेंबर 2025) : दीपनगरात 660 मेगावॅट प्रकल्प कार्यालयाच्या गेटवर कॅशिअरने सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याची घटना सोमवार, 29 रोजी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी संशयीताविरोधात भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले सुरक्षा रक्षकासोबत ?
सोमवारी प्रथम सत्रात सुक्षक्षा रक्षक राहुल साहेबराव चव्हाण हे प्रकल्प कार्यालयाच्या गेटवर कर्तव्यावर होते. केंद्रात कार्यरत कॅशिअर स्वप्निल भास्कर पाटील हे नशेत बुलेट (एम.एच.19 सी.टी. 3798) वरून आले व त्यांनी बुलेट रस्त्याच्या मध्यभागी उभी केली. सुरक्षा रक्षकाने त्यांना दुचाकी पार्किंगमध्ये वाहन लावण्याची विनंती केली मात्र पाटील यांनी शिविीगाळ करत वाद घातला. सुरक्षा रक्षकाला चापटाबुक्क्यांनी मारहाण केली तसेच नोकरी घालवण्याची धमकी दिली. ही माहिती मिळताच सहाय्यक सुरक्षा अधिकारी प्रवीण खैरे घटनास्थळी आले. यानंतर संबंधित कॅशिअरला ताब्यात घेऊन तालुका पोलिस ठाण्यात नेण्यात आले व त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड करीत आहेत.

