जळगाव मनपा निवडणूक : ललित कोल्हेंसह परिवारातील तिघांना शिंदे सेनेकडून तिकीट
Jalgaon Municipal Corporation Election : Lalit Kolhe and three other family members receive tickets from the Shinde faction of Shiv Sena जळगाव (30 डिसेंबर 2025) जळगाव महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असून या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह परिवारातील तिघांना शिवसेना शिंदे गटाने तिकीट दिले आहे. कोल्हे परिवाराने मंगळवारी दुपारी जळगाव महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
न्यायालयाच्या निर्देशानुसार भरला अर्ज
न्यायालयाच्या निर्देशानुसार ललित कोल्हे यांचा अर्ज भरल्याचे स्पष्टीकरण शिंदे गटाच्या महिला जिल्हाध्यक्ष तथा त्यांच्या पत्नी सरिता-कोल्हे यांनी दिले आहे.

शिंदेंकडून कोल्हे कुटुंबात तिघांना तिकीट
सरिता कोल्हे यांनी ललित कोल्हे यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून शिवसेना शिंदे गटाकडून केवळ ललित कोल्हेच नव्हे तर त्यांचा मुलगा पियुष कोल्हे आणि सासूबाई माजी नगरसेविका सिंधुताई कोल्हे यांनाही उमेदवारी देण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे कोल्हे कुटुंबातील तीन सदस्य निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार !
ललित कोल्हे सध्या कारागृहात असले तरी त्यांच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी आपण सांभाळणार असल्याचेही सरिता कोल्हे यांनी स्पष्ट केले. मतदारराजा ललित कोल्हे यांच्यासह परिवारामागे ठामपणे उभे राहतील, असा विश्वास सरिता कोल्हे यांनी यावेळी व्यक्त केला.
