नशिराबाद पोलिस ठाण्याचा एपीआय योगिता नारखेडे यांनी स्वीकारला पदभार
API Yogita Narkhede has taken charge of the Nashirabad police station भुसावळ (30 डिसेंबर 2025) : नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक ए.सी.मनोरे यांची पोलिस निरीकक्षपदी पदोन्नतीवर बदली झाल्याने त्यांच्या रिक्त जागेवर जळगाव अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या सहाय्यक निरीक्षक योगिता नारखेडे यांची नियुक्ती करण्यात आली.
नारखेडे या अत्यंत शिस्तप्रिय अधिकारी असून जिल्ह्यात काम केल्याचा त्यांना मोठा अनुभव आहे. पदभार घेतल्यानंतर नागरिकांनी पोलिस ठाण्याबाहेर ढोल-ताशांचा गजर व फटाक्यांची आतषबाजी करीत त्यांचे स्वागत केले. यावेळी मनोरे यांचा सहृदय कर्मचार्यांनी सत्कार केला व नूतन अधिकार्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मनोरे यांच्याकडून यावेळी नारखेडे यांनी पदभार स्वीकारला.

कायदा-सुव्यवस्थेला प्राधान्य
यापूर्वी जळगाव जिल्ह्यातच काम केले असून त्या अनुभवाचा फायदा निश्चितपणे येथील कामकाज करताना येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासह त्यांच्या तक्रारींचे निरसन करण्यावर भर तसेच कायदा-सुव्यवस्थेला प्रथम प्राधान्य असेल, असे त्यांनी यावेळी सांगितले.
