जळगाव मनपा निवडणूक : भाजपाला 46 तर शिंदेसेनेला 23 व राष्ट्रवादीला सहा जागा
भाजपा बॅक फूटवर : गतवेळेपेक्षा 11 जागा मिळाल्या कमी
Jalgaon Municipal Corporation Election : BJP gets 46 seats, Shinde faction of Shiv Sena gets 23, and NCP gets six seats जळगाव (31 डिसेंबर 2025) : 2018 च्या निवडणुकीत भाजपने स्वबळावर 75 जागा लढवून 57 जागा जिंकल्या मात्र यंदा होणार्या मनपा निवडणुकीत भाजपा बॅकफूटवर गेली असून युतीच्या धर्मामुळे भाजपला केवळ 46 जागांवर समाधान मानावे लागले व 11 जागा कमी असूनही भाजप समाधान मानले तर शिंदे सेनेला 23 तर राष्ट्रवादीला (अजित पवार) सहा जागा देण्यात आल्या आहेत.
अखेरच्या दिवशी युतीची घोषणा
युतीची घोषणा उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झाल्याने उमेदवारी अर्ज भरणार्यांची गर्दी उसळल्याने प्रशासकीय यंत्रणेची चांगलीच धावपळ उडालेली दिसून आली.

सर्वच पक्षांना बंडखोरीचा ताप
जळगाव मनपासाठी 24 डिसेंबर रोजी 24 अर्ज तर सोमवारी 250 अर्ज आले होते मात्र मंगळवारी हा आकडा 763 वर गेला. दुसरीकडे उमेदवारांनी समर्थकांच्या गर्दीत शक्तिप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. महायुतीने अधिकृत यादी जाहीर केली असली तरी, ज्यांचे पत्ते कट झाले आहेत अशा अनेक इच्छुकांनी अपक्ष किंवा इतर पक्षांकडून आपले नशीब आजमावण्याचे ठरवले आहे. जागा वाटपात मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांचा वरचष्मा दिसून आला. भाजपमध्ये ‘आयात’ केलेल्या उमेदवारांना झुकते माप मिळाल्याने आणि जागा वाटपात जागा कमी झाल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये मोठी खदखद आहे.
मविआत दोनच पक्ष
महाविकास आघाडीत राष्ट्रवादी (शरद पवार) व उद्धव सेना हे दोनच पक्ष सोबत आहेत. उद्धव सेना 38 तर राष्ट्रवादी 37 जागा लढवीत आहेत. काँग्रेस महाविकास आघाडीसोबत नाही. त्यांनी वंचितसह अन्य पक्षांना सोबत घेतले आहे. त्यात काँग्रेस स्वतः 25 जागा लढवत असून अन्य जागा उर्वरित घटक पक्षांसाठी सोडण्यात आल्या आहेत.
