भुसावळातील माहिती अधिकार कार्यकर्ता केदार सानपांविरोधात विनयभंगाचा गुन्हा

केदार सानप म्हणाले राजकीय दबावातून गुन्हा ः हा तर प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न


A case of molestation has been registered against Kedar Sanap, a Right to Information activist from Bhusawal भुसावळ (31 डिसेंबर 2025) : शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ते केदार वामन सानप यांच्याविरोधात 40 वर्षीय महिलेचा वारंवार पाठलाग करीत विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असे आहे प्रकरण
40 वर्षीय महिला कुटुंबासह वास्तव्यास आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, 29 डिसेंबर रोजी दुपारी कामानिमित्त मोठ्या मुलासोबत तहसील कार्यालयाकडे जात असताना यावल रोड परिसरात संशयित केदार सानप (रानातला महादेव, हुडको कॉलनी, भुसावळ) याने तिचा पाठलाग केला. यावेळी त्याने महिलेकडे वाईट नजरेने पाहत अश्लील हावभाव व इशारे केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे महिला भयभीत झाली. यापूर्वी दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी संशयित दबाव टाकत असल्याचाही आरोप महिलेनं केला आहे. तपास पोलीस निरीक्षक उध्दव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

राजकीय दबावातून गुन्हा
आपल्याविरोधात गुन्हा राजकीय दबावातून दाखल झाल्याची माहिती केदार सानप यांनी माध्यमांना दिली आहे. 29 रोजी एनसी व दुसर्‍या दिवशी 30 रोजी दाखल एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आपण अनेक वर्षांपासून सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता म्हणून लोकांचे समाजहिताचे कामे करतो तसेच शासनाचे जिथे नुकसान होते त्या अनुषंगाने मी वरिष्ठ कार्यार्लयात त्यांच्या विरूध्द तक्रार अर्ज करतो. सामाजिक काम करीत असतांना माझी प्रतिमा समाजात मलीन करण्याचे काम महिला करीत असून आरोप करणार्‍या महिलेला आपण ओळखतही नाही. ज्या दिवशी आपल्याविरोधात गुन्हा दाखल झाला त्यावेळी तहसील कार्यालयात माहिती अधिकार सुनावणीसाठी सकाळी 11.15 ते 12 वाजेपर्यंत उपस्थित होते. याआधी सुध्दा सदरील महिलेने माझ्यासह माझ्या मुलाविरूध्द अशा अनेक खोट्या तक्रारी दाखल केल्या आहेत. माझ्या विरूध्द अशी वारंवार खोटी तक्रार झाल्यामुळे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलिस महानिरीक्षक, पोलिस अधीक्षक, पोलिस उपअधीक्षक यांच्याकडे न्यायासाठी अर्ज दाखल करणार आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !