भाजप ‘कार्यकर्तामुक्त पक्ष’ ; पक्षाचा रिमोट लवकरच अदानी-अंबानींकडे ! काँग्रेसची बोचरी टीका


BJP is a ‘party without workers’ ; the party’s remote control will soon be in the hands of Adani and Ambani! Congress’s scathing criticism मुंबई (31 डिसेंबर 2025) : भाजपा पक्षासाठी सतरंज्या उचलणार्‍या निष्ठावंतांना डावलून ‘आयारामां’ना रेड कार्पेट अंथरल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण राज्यात असतानाच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर आणि महायुतीतील गुन्हेगारीकरणावर सडकून टीका केली. काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला असून लवकरच या पक्षाचा रिमोट रेशीमबागेकडून अदानी-अंबानींच्या हातात जाणार असल्याचे सपकाळ म्हणाले आहेत.

विधानसभा निवडणुकीतही असेल गोंधळ!
सपकाळ म्हणाले की, नगरसेवकपदासाठी भाजपमध्ये जो गोंधळ सुरू आहे, तो आगामी विधानसभा निवडणुकीतही कायम असेल. मूळ भाजप आणि संघाच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून हा पक्ष आता ‘उपर्‍यांच्या’ हाती गेला आहे. मूळ भाजपा व संघाच्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून उपर्‍यांच्या हाती भारतीय जनता पक्ष गेल्याने लवकरच या पक्षाचे नियंत्रण हे नागपूरच्या रेशिमबागेतून नाही तर अदानी अंबानी यांच्याकडून होईल.

अजित पवारांचा पक्ष गुंडांचा, याआधी माफियांना प्रवेश
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधताना सपकाळ यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. अजित पवारांचा पक्ष हा आता केवळ गुंडांचा आणि माफियांना आश्रय देणारा पक्ष उरला आहे. मराठवाड्यातील गुन्हेगारी साम्राज्यातील नेत्यांना आणि कोयता गँगशी संबंधित लोकांना त्यांनी पक्षात स्थान दिले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातील भावाच्या शेतातील ड्रग्ज कंपनीचा वितरक हा अजित पवार यांच्या पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे दिसून आले, असे सपकाळ म्हणाले.

2026 काँग्रेससाठी संघटनात्मक वर्ष
सरत्या वर्षाला निरोप देताना हर्षवर्धन सपकाळ यांनी नवीन वर्षातील काँग्रेसची रणनीती स्पष्ट केली. 2026 हे वर्ष काँग्रेससाठी पूर्णपणे ‘संघटनात्मक वर्ष’ असेल. डिसेंबरपासूनच आम्ही याची तयारी सुरू केली आहे. सध्या पक्षात मोठ्या प्रमाणावर पक्ष प्रवेश होत असून कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावलेले आहे. नवीन वर्षात आम्ही वैचारिक मूठ बांधून अधिक ताकदीने जनतेसमोर जाणार आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !