भुसावळातील प्रभाग क्रमांक 25 मध्ये नालेसफाई
Drain cleaning in Ward No. 25 of Bhusawal भुसावळ (31 डिसेंबर 2025) : शहरातील प्रभाग क्रमांक 25 मधील श्रद्धा नगर तसेच साने गुरुजी नगर परिसरात नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने नाले सफाई मोहिमेला सुरुवात करण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे. भाजपाच्या नवनिर्वाचित नगरसेविका डॉ.छाया फालक-देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच समाजसेवक रूपेश देशमुख यांच्या पुढाकारातून स्वच्छता मोहिम राबवली जात आहे.
नागरिकांनी व्यक्त केले समाधान
नाल्यातील साचलेला कचरा, गाळ व अडथळे काढून परिसर स्वच्छ, सुरक्षित व आरोग्यदायी ठेवण्याचा ठाम निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. स्वच्छतेला प्राधान्य देत नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने श्रद्धा नगर व साने गुरुजी नगर मधील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. या उपक्रमामुळे प्रभागातील स्वच्छता व्यवस्थेला बळकटी मिळणार असून विकासाभिमुख कार्याचा नवा आदर्श निर्माण होत आहे.

