जळगाव जिल्ह्यात भ्रष्टाचारात महसूल विभाग अव्वल : गत वर्षात 77 लाचखोरांवर कारवाई


In Jalgaon district, the revenue department tops the list in corruption: Action was taken against 77 bribe-takers last year भुसावळ (1 जानेवारी 2026) : लाचखोरांविरोधात जळगाव एसीबीने धडक कारवाई सत्र अवलंबल्याने लाचखोरांच्या गोटात खळबळ असलीतरी लाच घेणार्‍यांचे प्रमाण वाढतच चालले आहे. गत 2025 वर्षात जळगाव एसीबीने विविध विभागात तब्बल 45 कारवाया केल्यानंतर 77 लाचखोर जाळ्यात अडकले आहेत. विशेषतः लाचखोरीत महसूल विभाग अव्वल आल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.

भ्रष्टाचार्‍यांचे दणाणले धाबे
जळगाव एसीबीने दिलेल्या आकडेवारीनुसार, यंदाही महसूल विभाग लाचखोरीत आघाडीवर आहे, महसूल विभागात सात कारवायांमध्ये 13 जणांना जाळ्यात ओढण्यात आले. त्यापाठोपाठ पोलीस विभाग, जिल्हा परिषद आणि महावितरण या विभागात प्रत्येकी पाच कारवाया करण्यात आल्या.

अशी झाली गत वर्षात कारवाई
महसूल विभाग : 7 कारवाया (13 आरोपी)
पोलीस विभाग : 5 कारवाया (9 आरोपी)
जिल्हा परिषद : 5 कारवाया (6 आरोपी)
महावितरण : 5 कारवाया (5 आरोपी)
शिक्षण विभाग : 4 कारवाया (7 आरोपी)
वन विभाग : 3 कारवाया (9 आरोपी)
महानगरपालिका/नगरपालिका : एकूण 3 कारवाया (6 आरोपी)

वरिष्ठ अधिकारीही जाळ्यात
वर्ग 1 चे अधिकारी : 03
वर्ग 2 चे अधिकारी : 06
वर्ग 3 चे कर्मचारी : 35
वर्ग 4 चे कर्मचारी : 04
इतर लोकसेवक व खाजगी व्यक्ती: 30 जण यांचा समावेश आहे.

2025 मध्ये आठ कारवाया अधिक
एसीबीच्या माहितीनुसार 2024 मध्ये 37 गुन्ह्यांमध्ये 61 आरोपींवर कारवाई करण्यात आली तर 2025 मध्ये 45 गुन्ह्यांमध्ये 78 आरोपींवर कारवाई करण्यात आली व त्यातील 77 आरोपींना अटक करण्यात आली तर एकाला अटकपूर्व जामीन मिळाला.

यांनी केली कारवाई
भ्रष्ट लोकसेवकांविरोधात एसीबीचे पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात सहकार्‍यांनी कारवाई केली. लाचखोरांविरोधात कारवाईसाठी 1064 अथवा पोलिस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या मोबाईल 9702433131 वर संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !