लिफ्टच्या बहाण्याने तरुणीवर धावत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार
A young woman was gang-raped in a moving car under the pretext of being offered a lift दिल्ली (2 जानेवारी 2026) : कारमध्ये लिफ्ट देण्याच्या बहाण्याने तरुणीवर धावत्या कारमध्ये सामूहिक अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपींनी फरिदाबाद-गुरुग्राम रस्त्यावर दोन तास प्रवास केल्यानंतर पीडीतेला मारहाण केली व नंतर मध्यरात्री चालत्या गाडीतून बाहेर फेकले. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली.
काय घडले तरुणीसोबत ?
पीडितेचे तिच्या आईशी भांडण झाल्याने ती तिच्या बहिणीला फोन करून तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली. तिने सांगितले होते की, ती तिच्या मैत्रिणीच्या घरी जात आहे आणि सुमारे तीन तासांत परत येईल. पीडिता रात्री 12.30 च्या सुमारास घरी परतण्यासाठी तिच्या मैत्रिणीच्या घरातून निघाली. तेव्हा ती मेट्रो चौकात पोहोचली तेव्हा ती ऑटोरिक्षा मागत होती. एक कार आली, यामध्ये दोन पुरुष होते, त्यांनी तिला लिफ्ट दिली.

यानंतर, त्यांनी फरिदाबादहून गुरुग्रामला गाडी चालवली. त्यांनी फरिदाबाद-गुरुग्राम रस्त्यावर सुमारे दोन तास गाडी चालवली. यादरम्यान एका पुरूषाने गाडी चालवली तर दुसर्याने तरुणीवर अत्याचार केले. तिने विरोध केला तेव्हा तिला मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यांनी मुलीला रस्त्यावर फेकून दिले आणि पळून गेले.
त्यानंतर पीडितेने तिच्या बहिणीला तिच्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल सांगितले. त्यानंतर तिला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथून तिला एम्समध्ये रेफर करण्यात आले. सध्या तिच्यावर फरीदाबादमधील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

