लग्नाला नकार देणार्या प्रियकराला महिलेने घरी बोलावले नंतर जे घडले ते वाचून बसेल धक्का !
A woman invited her boyfriend, who had refused to marry her, to her home, and what happened next will leave you shocked! मुंबई (2 जानेवारी 2026) : प्रेमात आंधळ्या झालेल्या महिलेने वारंवार प्रियकराकडे लग्नाची विचारणा केली मात्र प्रियकर लग्नाला नकार देत असल्याने महिलेने नववर्षाची मिठाई देण्याच्या बहाण्याने प्रियकराला घरी बोलावले व नंतर चाकूने त्याचे लिंगच कापल्याची धक्कादायक घटना सांताक्रुझ पूर्व येथील कलिना परिसरात नववर्षाच्या रात्री घडली. वाकोला पोलिसांनी आरोपी महिलेविरोधात गंभीर दुखापत केल्याप्रकरणी व धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. जोगिंदर लखन महतो (44) असे जखमीचे नाव आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
महतो हा जांभळीपाडा परिसरात राहत असून खासगी वाहनचालक आहे. गेल्या 18 वर्षांपासून ते कुटुंबासह या भागात वास्तव्यास आहेत. जोगिंदर यांचे त्यांच्या बहिणीच्या नणंदेसोबत म्हणजेच कंचनदेवी राकेश महतो (25) हिच्यासोबत गेल्या सहा ते सात वर्षांपासून प्रेमसंबंध होते.

कंचन ही जोगिंदरवर पत्नीला सोडून तिच्यासोबत राहण्याचा व लग्न करण्याचा दबाव टाकत होती. या कारणामुळे जोगिंदर यांच्या कुटुंबात वारंवार वाद होत होते. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने नोव्हेंबर महिन्यात जोगिंदर मुंबई सोडून बिहारला गेले होते मात्र त्या काळातही कंचन सतत फोन करून मुंबईत परत येऊन लग्न करण्याची धमकी देत असल्याचा आरोप जोगिंदर यांनी केला. 19 डिसेंबर रोजी जोगिंदर पुन्हा मुंबईत परतले मात्र त्यांनी कंचनपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता.
31 डिसेंबर रोजी रात्री सुमारे 1.30 वाजता कंचनने नववर्षानिमित्त मिठाई देण्याच्या बहाण्याने जोगिंदरला आपल्या घरी बोलावले. त्यावेळी घरात कंचन आणि तिची दोन लहान मुले उपस्थित होती. मुले झोपल्यानंतर कंचनने स्वयंपाकघरातील भाजी कापण्याच्या चाकूने जोगिंदरवर अचानक हल्ला करून त्याचे लिंग कापले. गंभीर जखमी अवस्थेत जोगिंदर कसाबसा आपल्या घरी पोहोचला आणि संपूर्ण प्रकार कुटुंबीय व शेजार्यांना सांगितला. त्यानंतर त्यांना तातडीने प्रथम देसाई रुग्णालयात, त्यानंतर पुढील उपचारांसाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले.

