15 हजारांची लाच घेताना सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
An assistant forest conservator officer was caught by the ACB while accepting a bribe of 15,000 rupees बुलढाणा (2 जानेवारी 2026) : महिन्यापूर्वीच प्रमोशन मिळालेल्या वनविभागाच्या महिला अधिकार्याला एसीबीने 15 हजारांची लाच घेताना पकडल्याने लाचखोर हादरले आहेत. अवैध मार्गाने तोडलेल्या झाडांची वाहतूक करण्यासाठी ही लाच मागण्यात आल्याने बुलढाणा वनविभागाच्या सहायक वन संरक्षक अधिकारी अश्विनी आपेट यांना व लिपिक अमोल मोरे यांना अटक करण्यात आली.
असे आहे लाच प्रकरण
अश्विनी आपेट ही 2016 बॅचची रेंज फॉरेस्ट ऑफिसर असून गेल्या वर्षीच तिला सहायक वन संरक्षक अधिकारी बढती मिळाली. अश्विनी आपेट हिच्याबद्दल पैशासंबंधी अनेक तक्रारी वरिष्ठ अधिकार्यांकडे पोहोचल्या होत्या परंतु वरिष्ठांनी त्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याची माहिती आहे.

वनविभागाच्या हद्दीतील तोडलेल्या झाडांची वाहतून करण्यासाठी अश्विनी आपेट हिने 30 हजारांची लाच मागितली होती. त्यापैकी अॅडव्हान्स म्हणून 15 हजार स्वीकारताना ही कारवाई करण्यात आली. अश्विनी आपेट हिच्याबद्दल लाचलुचपत विभागाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचून ही कारवाई केली.
सहायक वन संरक्षक अधिकारी अश्विनी आपेट आणि लिपिक अमोल मोरे यांना ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी सुरू आहे.
अश्विनी आपेट ही बुलढाणा वनविभागात सहायक वन संरक्षक अधिकारी म्हणून कार्यरत आहे. या विभागात ती लाचखोर अधिकारी म्हणून ओळखली जायची, अशी माहिती सूत्रांनी दिली. हाताखालच्या कर्मचारी, अधिकार्यांना ती पैसे गोळा करण्यासाठी दबाव टाकायची अशी माहिती आहे. त्या संदर्भात वरिष्ठ अधिकार्यांकडे अनेक तक्रारी झाल्याची माहितीही समोर येत आहे.

