भुसावळ नाहाटा महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी ‘व्यावसायिक अभ्यासक्रमातील संधी ’ विषयावर व्याख्यान


भुसावळ (2 डिसेंबर 2026) : शहरातील कला, विज्ञान आणि पू.ओं. नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य व व्यवस्थापन विभाग व माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने वाणिज्य शाखेतील वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी व्यवसायिक अभ्यासक्रमातील संधी या विषयावर शुक्रवार, 2 रोजी सीए मुकेश अग्रवाल यांचे व्याख्यान झाले.

यांची होती उपस्थिती
व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.बी.एच.बर्‍हाटे, महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डी.एन.पाटील, उपप्राचार्य प्रा.डॉ. जी.आर.वाणी, उपप्राचार्य प्रा.वाय.एम.पाटील, पर्यवेक्षिका प्रा.स्वाती पाटील, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष प्रा.प्रशांत पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विभाग प्रमुख प्रा.डॉ.ममताबेन पाटील इत्यादी उपस्थित होते. या कार्यक्रमात आयसीआयसीआय जळगाव शाखा येथील सचिन शिंदे व विनोद जाधव तसेच वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील सर्व प्राध्यापक वृंद, प्रा.डॉ.एस.टी धूम, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य व व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थी इत्यादी उपस्थित होते.



या कार्यक्रमात प्रमुख वक्ते चार्टर्ड अकाउटंट मुकेश अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना चार्टर्ड अकाउटंट या व्यावसायिक अभ्यासक्रम संदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांना आजच्या युगात या अभ्यासक्रमाचे महत्त्व, आवश्यकता, घ्यावे लागणारे परिश्रम, या अभ्यासक्रमाद्वारे उपलब्ध होणार्‍या रोजगार संधी, चार्टर्ड अकाउंटंट चे समाजात महत्व, आवश्यकता इत्यादी विषयावर माहिती दिली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेतील या व्यावसायिक अभ्यासक्रमाचे महत्व समजावे व या अभ्यासक्रमातील उपलब्ध संधीचा उपयोग करून घ्यावा, त्यासाठीचे परिश्रम घ्यावे, आवश्यक कौशल्य आपल्या विकसित करावे. परिश्रम केले असता सर्व काही शक्य होते असे सांगितले.

यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
सूत्रसंचालन प्रा.डॉ.चंद्रकांत सरोदे तर आभार प्रा. स्मिता बेंडाळे यांनी मानले. वाणिज्य व व्यवस्थापन विभागातील प्रा. डॉ. के. पी. पाटील , प्रा. डॉ. रश्मी शर्मा, प्रा. भूषण चौधरी, प्रा. खिलेश पाटील, प्रा. डॉ. सपना जंगले, प्रा. स्वाती शेळके, प्रा.ललिता पाटील, प्रा. सोनिया टेकवाणी, प्रा. नंदनी दायमा, प्रा. प्रियंका खडसे, प्रा. पूजा भंडारी,प्रा. एकता बजाज तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष डॉ.आशिष चौधरी, कोषाध्यक्ष,प्रा. हर्षल पाटील, संचालिका प्रा.डॉ.गौरी पाटील यांचे सहकार्य लाभले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !