भुसावळातील बियाणी पब्लिक स्कुलमध्ये ‘स्पोर्टस् डे’
भुसावळ (2 डिसेंबर 2026) : शहरातील बियाणी पब्लिक स्कूलमध्ये शुक्रवार, 2 रोजी स्पोर्ट डे झाला. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.सांतनूकुमार साहू हे होते. यावेळी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी,सेक्रेटरी डॉ.संगीता बियाणी, स्मिता बियाणी, आयुषी बियाणी, राजेश पारीख, प्रवीण भराडिया, प्रिंसीपल रुद्रसेन गंठिया, डी.एम.पाटील, कांचन जोशी, सुशील नारखेडे,आकाश इंगळे उपस्थित होते.
सुरुवातीला स्पोर्ट ध्वज फडकवण्यात आला. त्यानंतर क्रीडा ज्योत पेटवून तसेच आकाशात बलून सोडून स्पोर्ट डे चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे डॉ.साहू यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासा सोबत खेळणे देखील आवश्यक असल्याचे तसेच खेळल्याने आपली प्रतिकारशक्ती चांगली असते, खेलोगे तो बढोगे तसेच खेळणे गरजेचे झाले असल्याचे सांगितले. प्रसंगी विद्यार्थ्यांनी मार्च पास, ड्रिल तसेच विविध खेळ यावेळी सादर केले. शंभर मीटर धावणे, बेडूक उडी, भालाफेक, थाळी फेक, गोला फेक अशा विविध स्पर्धा यावेळेस घेण्यात आल्या. स्पर्धेमध्ये विजयी विद्यार्थ्यांना पारितोषिक देण्यात आले. सूत्रसंचालन अलीना खान यतर आभार रुद्रसेन गंठीया यांनी मानले.









