आर्थिक वादातून चॉपरने खून : न्यायालयाने सुनावला आरोपीला आजन्म कारावास


Murder committed with a chopper due to a financial dispute : The court sentenced the accused to life imprisonment नाशिक (2 जानेवारी 2026) : आर्थिक वादातून त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रौढाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपीला नाशिक जिल्हा न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. धनंजय यादवराव तुंगार (46, रा.पाचआळी, ता.त्र्यंबकेश्वर, जि.नाशिक) असे मृताचे तर समीर भालचंद्र गोंदके (25, रा.पाचआळी, त्र्यंबकेश्वर) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.

असे आहे खून प्रकरण
21 ऑक्टोबर 2020 रोजी एक वाजेच्या सुमारास पाचआळी, ता.त्रंबकेश्वर येथत्े आर्थिक वादातून आरोपी समीर भालचंद्र गोंदके (25, रा.पाचआळी, त्र्यंबकेश्वर) याने धनंजय यादवराव तुंगार (46, रा.पाचआळी, ता.त्र्यंबकेश्वर, जि.नाशिक) यांची चाकूचे वार करीत हत्या केली होती. या प्रकरणी योगेश विश्वास तुंगार (44, पाचआळी, ता.त्र्यंबकेश्वर) यांच्या फिर्यादीवरुन आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

20 साक्षीदारांची तपासणी
नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले व 20 साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. न्या.ए.के.लाहोटी यांनी आरोपीला 302 अन्वये आजन्म कारावास व 10 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली व दंड न भरल्यास तीन महिने सक्त कैदेची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा यशस्वी तपास त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक आर.टी.कर्पे यांनी केला.

या खटल्यात सरकारी अभियोक्ता म्हणून जगदीश सोनवणे, सचिन गोरवाडकर यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी एएसआय राजेंद्र कोठुळे, हवालदार कारभारी यादव होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !