जळगावातील सुवर्ण व्यावसायीकाला 32 लाखांचा गंडा : सोने घेवून कारागीर पसार
A gold merchant from Jalgaon was defrauded of 32 lakhs : the craftsman absconded after taking the gold जळगाव (2 जानेवारी 2026) : सुवर्ण व्यावसायीकाचा विश्वास संपादन करीत दोघा कारागीरांनी 31 लाख 69 हजार रुपयांचे सोने घेऊन पोबारा केल्याची घटना जळगावात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे प्रकरण ?
फिर्यादी तोटन बलराम मायती (51, रा.मातोश्री बिल्डिंग, जोशी पेठ, जळगाव) हे सोनारकाम करतात. त्यांच्याकडे पश्चिम बंगालमधील दोन कारागीर कामाला होते. 4 डिसेंबर 2025 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास आरोपी असित गंगाबाला मन्ना आणि तापस रूपचंद मन्ना (दोन्ही रा. बंशकल, पश्चिम मेदिनीपूर, पश्चिम बंगाल) यांनी फिर्यादी तोटन मायती यांचा विश्वास संपादन केला.

मंगळसूत्र बनवण्यासाठी फिर्यादीने या दोघांना 20 कॅरेट शुद्धतेचे एकूण 297.100 ग्रॅम सोने दिले होते मात्र हे सोने दागिने बनवण्यासाठी घेऊन गेलेले दोन्ही आरोपी फिर्यादीला कोणताही पत्ता न देता आणि सोने परत न करता जळगावातून फरार झाले आहेत.
31 लाखांची फसवणूक चोरून नेलेल्या सोन्याची बाजारभावानुसार एकूण किंमत 31 लाख 69 हजार 412 रुपये इतकी आहे. अनेक दिवस शोध घेऊनही आरोपींचा पत्ता न लागल्याने अखेर 31 डिसेंबर रोजी फिर्यादीने शनिपेठ पोलिसात धाव घेतली. पोलीस कारवाई याप्रकरणी शनिपेठ पोलिसांनी आरोपी असित मन्ना आणि तापस मन्ना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
जळगाव शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक साजीद मन्सूरी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

