50 हजारांची लाच घेताना वीज कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यांसह वायरमन एसीबीच्या जाळ्यात
A power company’s assistant engineer and a wireman were caught in the ACB’s trap while accepting a bribe of 50,000 rupees अहिल्यानगर (2 जानेवारी 2026) : अॅक्वा प्लांटसाठी स्वतंत्र व्यावसायीक वीज मीटर बसवले असतानाही वीज चोरी केली जात असल्याचा आरोप करीत सहाय्यक अभियंत्यांसह वायरमन यांनी चार लाखांचा दंड होईल, अशी भीती घालून दोन लाखांची मागत सव्वा लाखांवर तडजोड केली व लाचेचा पहिला हप्ता म्हणून 50 हजार रुपये स्वीकारताना अहिल्यानगर वीज कंपनीचे सहाय्यक अभियंता किरण गजेंद्र मोरे (34) व प्रधान तंत्रज्ञ शिवकुमार नारायण आचारी (नेवासा ग्रामीण) यांना एसीबीने अटक केल्याने वीज कंपनीतील लाचखोर हादरले आहेत.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार बाबासाहेब हराळ यांच्या पत्नीच्या नावाने मंगलमूर्ती अॅक्वा नावाने आरओ प्लांट आहे. घर व प्लॉटसाठी स्वतंत्र वीज मीटर बसवले असतानाही 22 डिसेंबर रोजी मोरे व आचारी यांनी येत वीज चोरीचा आरोप करीत कारवाई झाल्यास चार लाखांचा दंड भरावा लागेल, अशी भीती घातली व 36 हजार रुपये वीज बिल भरण्यास सांगितले. त्यानंतर 35 रोजी दोन्ही संशयीत पुन्हा घरी आले व त्यांनी दोन लाख रुपये दिल्यास चोरीची कारवाई करणार नाही, असे सांगितले.

तक्रार नोंदवल्यानंतर कारवाई
एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली असता 31 रोजी आरोपींनी सव्वा लाखा रुपये लाच मागणी केल्याचे समोर आल्यानंतर सापळा रचण्यात आला व लाचेचा पहिला हप्ता 50 हजार रुपये स्वीकारताना दोन्ही आरोपींना देवरे हॉस्पीटलजवळ, नेवासा फाटा येथे पकडण्यात आले.
यांनी केला सापळा यशस्वी
पोलीस अधीक्षक भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक छाया कडू देवरे यांच्या नेतृत्वात कॉन्स्टेबल गजानन गायकवाड, सचिन सुद्रुक, वैभव सुपेकर आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

