राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत ज्योती वानखेडे प्रथम
Jyoti Wankhede secured first place in the state-level yoga competition भुसावळ (3 जानेवारी 2026) : महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगावतर्फे 20 डिसेंबरला शिक्षक व अधिकारी कर्मचारी विभागीय योगासन स्पर्धा नंदुरबार येथे झाल्या. यात जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यातील सर्व शिक्षक अधिकारी कर्मचारी स्पर्धेसाठी उपस्थित होते. त्यात 46 ते 58 वयोगटात एकूण 40 स्पर्धक सहभागी झाले.
या स्पर्धेत ज्योती मुरलीधर वानखेडे जि.प.शाळा, वांजोळा, ता.भुसावळ यांनी प्रथम स्थान पटकावले व आपल्या तालुका व जिल्ह्याचे नावलौकिक वाढवला. वानखेडे या जानेवारी महिन्यात राज्यस्तर योगासन स्पर्धेसाठी पात्र ठरल्या आहेत. त्यांचे भुसावळ शिक्षण विभाग, केंद्रप्रमुख, शिक्षक, गावकरी यांचेकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.









