फैजपूर पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण लोखंडे
उपाध्यक्षपदी उत्तरा कोळी : समस्या सोडवण्यासाठी पदाधिकारी कटीबद्ध
Laxman Lokhande has been elected as the president of the Faizpur Police Patil Association यावल (3 जानेवारी 2026) : फैजपूर विभागातील पोलीस पाटील संघटनेची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण लोखंडे यांची तर उपाध्यक्षपदी उत्तरा कोळी यांची निवड करण्यात आली. या शिवाय सचिवपदी सुरेश खैरनार, खजिनदार दिनेश बाविस्कर व कार्यकारी सदस्य संतोष सुरवाडे, फारूक तडवी, संगीता दांडगे, यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
प्रलंबित प्रश्न मार्गी लावणार
या निवडीमुळे पोलीस पाटील संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले असून, विभागातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नूतन अध्यक्ष लक्ष्मण लोखंडे यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले की, पोलीस पाटील आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून संघटना अधिक प्रभावीपणे काम करेल. पोलीस पाटलांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना योग्य मान-सन्मान मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. उपाध्यक्षपदी निवड झालेल्या उत्तरा कोळी यांनीही महिला पोलीस पाटलांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार असल्याचे नमूद केले. या निवडीबद्दल तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी नूतन पदाधिकार्यांचे अभिनंदन केले.



निवडीनंतर पदाधिकार्यांचे स्वागत
निवडीप्रसंगी फैजपूर विभागातील विशाल जवरे, सुरेश खैरनार, हरीश चौधरी, फारूक तडवी, दिनेश बाविस्कर, प्रफुल्ला चौधरी, उत्तरा कोळी, मीना चव्हाण, कैलास बादशाह, पुरुषोत्तम पाटील, संतोष सुरवाडे, निलेश सोनवणे, रवींद्र साळवे, लक्ष्मण लोखंडे , अरुण पाटील सह सर्व पोलीस पाटील उपस्थित होते. फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे उपनिरीक्षक सय्यद यांनी अध्यक्ष उपाध्यक्ष कार्यकारिणीचे स्वागत केले.






