डोंगरकठोर्‍यात अ.ध.चौधरी विद्यालयाने गावात राबविले ई कचरा जनजागृती व संकलन अभियान


In Dongarkathora, A.D. Chaudhary Vidyalaya conducted an e-waste awareness and collection campaign in the village यावल (3 जानेवारी 2026) : यावल तालुक्यातील डोंगरकठोरा या गावात अ.ध.चौधरी विद्यालयाच्या वतीने गावात ई कचरा जनजागृती व संकलन अभियान राबवण्यात आले. हे अभियान हे गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता 2025- 26 अंतर्गत राबवण्यात आले आहे. या उपक्रमात गावातील रस्ते,सार्वजनिक ठिकाणे आणि शाळेचे परिसर साफ करण्यात आले.

कचरा संकलन अभियान
डोंगरकठोरा, ता.यावल येथे गांधी तीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता 2025- 26 अंतर्गत अ.ध.चौधरी विद्यालय व जुनिअर कॉलेज व ग्रामपंचायत यांनी एकत्र येऊन गाव स्वच्छता व ई कचरा जनजागृती तसेच संकलन अभियान राबवले. यासाठी एक दिवस आधी गावामध्ये दवंडी देऊन ग्रामस्थांना आवाहन करण्यात आले होते.या उपक्रमात गावातील रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि शाळेचे परिसर साफ करण्यात आले. त्याचप्रमाणे प्लास्टिक व ई कचर्‍यामुळे होणारे दुष्परिणाम याविषयी पथनाट्य सादर करण्यात आले.




गावातील परिसर स्वच्छ राखण्याचे आवाहन
जनजागृतीपर रॅलीही काढण्यात आली. गावकर्‍यांनीही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला व स्वच्छतेचे महत्त्व तसेच ई-कचर्‍याचे दुष्परिणाम समजावून घेतले. यावेळी विद्यार्थिनींनी स्वच्छतेचे महत्व यावर जनजागृतीपर गाणे सादर केले. विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून घरोघरी जाऊन ई कचरा संकलन केले. विद्यार्थ्यांमध्ये आणि गावकर्‍यांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी शाळेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. यामध्ये रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, घोषवाक्य स्पर्धा आदी स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमामुळे गावातील परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी सरपंच नवाज तडवी, ग्रामविकास अधिकारी तुळशीराम बगडे, संस्थाध्यक्ष डॉ.आर.सी.झांबरे, एम.ओ.चौधरी, मुख्याध्यापक नितीन झांबरे, प्रा.नंदन वळींकार, प्रवीण कुयटे, राजू चिमणकारे, मनीषा तडवी, सचिन भंगाळे, विवेक कुलट, शुभांगिनी पाटील, सोनाली फेगडे, चेतन चौधरी, रामेश्वर जानकर, नयना पाटील, ठकसेन राणे, पराग पाटील, संदीप बाविस्कर आदी उपस्थित होते.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !