भुसावळातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंना अभिवादन
At Shri Sant Gadge Baba Hindi College in Bhusawal, tributes were paid to Krantijyoti Savitribai Phule भुसावळ (3 जानेवारी 2026) : शहरातील श्री संत गाडगेबाबा हिंदी महाविद्यालयात शनिवार, 3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. सर्वप्रथम प्राचार्य डॉ.रमेश जोशी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. सर्व प्राध्यापकांनी सावित्रीबाई फुले यांना पुष्प अर्पण करून नमन केले.
मुलींसाठी सुरू केली पहिली शाळा
याप्रसंगी डॉ.रमेश जोशी यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, स्त्रीला स्वाभिमानाने शिक्षण मिळावे यासाठी सावित्रीबाईंनी अहोरात्र संघर्ष केले. मुलींची पहिली शाळा सुरू करून मुलींना शिक्षण मिळावे म्हणून अहोरात्र कष्ट घेतले. अशा त्यागमय मूर्तीला आम्ही सर्वजण नमन करतो असे सांगितले. याप्रसंगी डॉ.सुधीर शर्मा, डॉ विवेक जोशी, प्रा.अनुपम शर्मा, प्रा.ज्योती ओस्तवाल, डॉ.किशोर चौधरी, अनुराग साळुंखे, बद्री प्रसाद केवट व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.









