भुसावळ-दादर विशेष ट्रेनला मुदतवाढ ; फेब्रुवारीअखेर धावणार ‘स्पेशल’ गाड्या
Bhusawal-Dadar special train service extended ; the ‘special’ trains will run until the end of February भुसावळ (3 जानेवारी 2026) : रेल्वे प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने भुसावळकरांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. भुसावळ आणि दादर दरम्यान धावणार्या दोन विशेष रेल्वे गाड्यांच्या फेर्यांमध्ये वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाने घेतला आहे. यामुळे मुंबईला जाणार्या नोकरदार, विद्यार्थी आणि व्यापार्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
फेब्रुवारी 2026 पर्यंत गाड्यांची सेवा कायम
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या गाड्यांचा कालावधी आता फेब्रुवारी 2026 च्या अखेरपर्यंत वाढवण्यात आला आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या आणि लग्नसराईच्या काळात प्रवाशांची होणारी गैरसोय टळणार आहे.

असे आहे वाढीव फेर्यांचे नियोजन
दादर-भुसावळ साप्ताहिक विशेष (09049/09050)
गाडी क्र. 09049 (दादर-भुसावळ) ही गाडी आता 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत आपल्या निर्धारित दिवशी धावेल तसेच गाडी क्रमांक 09050 (भुसावळ-दादर) ही गाडी परतीच्या प्रवासासाठी देखील 27 फेब्रुवारी 2026 पर्यंत सेवेत असेल.
दादर-भुसावळ त्रि-साप्ताहिक विशेष (09051/09052):
गाडी 09051 (दादर-भुसावळ) या गाडीची सेवा 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. गाडी 09052 (भुसावळ-दादर) ही गाडी 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध राहील.
वेळापत्रक आणि थांबे जैसे थे
रेल्वे विभागाने स्पष्ट केले आहे की, या गाड्यांच्या वेळापत्रकात, थांब्यांमध्ये आणि कोचच्या रचनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. प्रवाशांनी अधिकृत माहितीसाठी ‘नॅशनल ट्रेन एन्क्वायरी सिस्टम’ या अॅपचा वापर करावा किंवा रेल्वेच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

