भालोद शिवारातील एकवीरा मातेसह म्हाळसा मंदिरातून 40 हजारांच्या दागिण्यांसह रक्कम लांबवली
In the Bhalod area, thieves stole jewelry and cash worth 40,000 rupees from the Ekveera Mata and Mhalasa temples यावल (3 जानेवारी 2026) : यावल तालुक्यातील भालोद गावाबाहेर असलेल्या कुलस्वामिनी एकविरा माता व म्हाळसा माता देवीच्या मंदिरात अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केली. 1 जानेवारीच्या रात्री झालेल्या या घटनेत चोरट्यांनी देवीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू असा एकूण 40 हजारांचा मुद्देमाल लांबवला.
पोलिसात तक्रार दाखल
मंदिराचे अध्यक्ष नारायण शशिकांत चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 1 जानेवारी रोजी रात्री 8 ते 2 जानेवारी सकाळी 7 वाजेच्या दरम्यान ही चोरी झाली. अज्ञात चोरट्यांनी मंदिराच्या लोखंडी गेटचे कुलूप तोडून गाभार्यात प्रवेश केला. सोन्याचे दागिने 15 हजार किंमतीच्या देवीच्या दोन ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या वाट्या, मंदिरातील लोखंडी दानपेटी तोडून त्यातील अंदाजे 15 हजारांची रोकड, तीन हजार रुपये किंमतीचे म्युझिक सिस्टमचे मशीन, अडीच हजार रुपयांचा एल.ई.डी. फोकस लाईट आणि तीन हजार रुपयांचा सी.सी.टी.व्ही. कॅमेरा, दिड हजार रुपये किंमतीचे देवीच्या अंगावरील बेन्टेक्सचे दागिने लांबवले. एकूण 40 हजारांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा
चोरट्यांनी केवळ चोरीच केली नाही, तर मंदिरातील सी.सी.टी.व्ही. कॅमेर्यांचेही नुकसान केले आहे. या प्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास एपीआय रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संतोष प्रल्हाद चौधरी करीत आहेत.

