जळगाव, धुळ्यासह सात जिल्ह्यात घरफोड्या : चिखलीचा कुख्यात गुन्हेगार गुन्हे शाखेच्या जाळ्यात


House break-ins in seven districts, including Jalgaon and Dhule : Notorious criminal from Chikhli caught in the crime branch’s net जळगाव (3 जानेवारी 2026) : जळगाव गुन्हे शाखेने सात जिल्ह्यात घरफोड्या करणार्‍या कुख्यात गुन्हेगाराच्या मुसक्या बांधल्या आहेत. आरोपीने जळगाव जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर आणि धुळे अशा तब्बल सात जिल्ह्यांमध्ये दिवसा घरफोड्या केल्या आहेत. किशोर तेजराव वायाळ (रा.मेरा बु.॥, ता.चिखली, जि.बुलढाणा) असे या सराईत चोरट्याचे नाव आहे. आरोपीच्या ताब्यातून एक लाख 97 हजार रुपये किमतीचे 35 ग्रॅम सोने जप्त करण्यात आले.

पहूर हद्दीतील घरफोड्यांची उकल
गतवर्षीय 3 डिसेंबर 2025 रोजी पहूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तोंडापूर आणि पहूर या गावांमध्ये अज्ञात चोरट्याने भरदिवसा घरफोड्या केल्या होत्या. एकाच दिवशी दोन ठिकाणी झालेल्या या चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.होते.

दोन दिवस पाळत अन आरोपी जाळ्यात
तपास पथकाने तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांचे जाळे विणले होते. या तपासात किशोर वायाळ याचे नाव समोर आले मात्र हा आरोपी अत्यंत सराईत असल्याने तो एका ठिकाणी वास्तव्यास राहत नसल्याने पथकाने सलग दोन दिवस त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले आणि त्याचा मागावर राहून अखेर त्याला शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने पहूरमधील दोन घरफोड्यांसह जामनेर आणि धुळे जिल्ह्यातील सिंदखेडा येथील दोन घरफोड्या मिळून पाच मोठ्या घरफोड्यांची कबुली दिली. त्याने चोरलेले सोने संभाजीनगर आणि चिखली परिसरात विकल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करून तो मुद्देमाल हस्तगत केला. आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी व्यक्त केली.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !