बोदवड तालुक्यातील तरुणाची आत्महत्या


A young man from Bodwad taluka committed suicide बोदवड (3 जानेवारी 2026) : 28 वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. या प्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सोपान नारायण पाटील (28, रा.सुरवाडे बु.॥, ता.बोदवड) असे मृताचे नाव आहे.

आत्महत्येचे कारण अस्पष्ट
सोपान पाटील या तरुणाने आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणावरून गळफास घेतला. हा प्रकार लक्षात येताच ज्ञानेश्वर नारायण पाटील यांनी सोपानला तातडीने उपचारासाठी भुसावळ येथील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल केले. ट्रॉमा केअर सेंटरमधील वैद्यकीय अधिकार्‍यांनी सोपानची तपासणी केली असता त्याला मृत घोषित केले. भुसावळ तालुका पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे बोदवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

बोदवड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विनोद श्रीनाथ हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !