यावल शहरात हुतात्मा बापू वाणी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
In Yawal city, tributes were paid to martyr Bapu Wani on his death anniversary यावल (4 जानेवारी 2026) : यावल शहरातील मेन रोड असलेल्या श्री दत्त मंदिरात गुरुवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करीत हुतात्मा बापूराव वाणी यांना 52 व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला. या कार्यक्रमात प्रतिमा पूजन करून हुतात्मा वाणी यांना अभिवादन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावल शहरात मेन रोडावर श्री दत्त मंदिर आहे. या दत्त मंदिरात गुरूवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करीत हुतात्मा बापूराव वाणी यांची 52 वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी भाजपाचे माजी शहराध्यक्ष निलेश गडे होते. कार्यक्रमात भुसावळातील प्रा.सुनील नेवे, भाजपा माजी तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, नगरसेविका कल्पना वाणी, अंबादास नेवे, सविता नेवे यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करून उपस्थितांनी अभिवादन केले. या कार्यक्रमात जळगाव येथील सविता नेवे व भुसावळ येथील प्रा.सुनील नेवे यांनी हुतात्मा बाबूराव वाणी यांच्या जीवन कार्याची माहिती दिली व त्यांच्या कार्याला उजाळा दिला. उपस्थितांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहली.









